मुंबई शहरची जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा २० जुलैला

  • By admin
  • June 26, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

मुंबई ः मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने २० जुलै रोजी जिल्हास्तरीय पंच परीक्षा घेण्यात येणार आहे.

जिल्हा संघटनेला संलग्न असलेल्या मंडळाच्या इच्छुकांनी आपले प्रवेश अर्ज प्रवेश शुल्कासह संघटनेच्या कार्यालयात १२ जुलैपर्यंत जमा करावेत. त्यानंतर आलेल्या नावांचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता पंच समितीचे अध्यक्ष महिंद्र हळदणकर (९८६९८७८५८१) किंवा सचिव सूर्यकांत देसाई (९८६९००३२२८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *