नाशिक येथे मिनी फुटबॉल फाईव्ह राष्ट्रीय स्पर्धेला थाटात प्रारंभ

  • By admin
  • June 26, 2025
  • 0
  • 85 Views
Spread the love

नाशिक ः मिनी फुटबॉल फाईव्ह फेडरेशन व महा मिनी फुटबॉल फाईव्ह असोसिएशन आणि नाशिक जिल्हा मिनी फुटबॉल फाईव्ह असोसिएशन, तसेच नाशिक डिस्टिक ऑलगेम असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली मिनी फुटबॉल फाईव्ह नॅशनल चॅम्पियनशिप नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुल फुटबॉल मैदान येथे उत्साहात सुरुवात झाली.

मिनी फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय ब्रिज गेम फेडरेशनचे खजिनदार हेमंत पांडे, टोकिओ ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे, मिनी फुटबॉल फेडरेशनचे सचिव दीपक निकम, अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अशोक कदम, अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक शहर युवा अध्यक्ष व्यंकटेश मोरे आणि आनंद खरे आदी अतिथी मान्यवर उपस्थित होते.

मिनी फुटबॉल सचिव दीपक निकम यांनी मिनी फुटबॉल या खेळाविषयी माहिती व नियमावली सांगितली. भारतातून १५ संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे ऑर्गनायझर सतीश बोरा, शैलेश रकिबे, अविनाश वाघ, नीरज राजभर, महेंद्र साळवे, वैशाली उशिरे, कविता कटारे, आनंद चकोर, राजू वाकडे हे काम बघत आहेत.

सदर स्पर्धेतून भारताचा संघ निवडला जाणार असून सदर संघ १३ ते १७ ऑगस्ट रोजी अंटलिया तुर्की या ठिकाणी जागतिक स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *