छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजी नगर जिल्हा तलवारबाजी संघटना व महाराष्ट्र तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १७ चाइल्ड व ६ मिनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन २७ ते २९ जून दरम्यान साई सेंटर छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साई केंद्राचे सहाय्यक संचालक सुमेध तरोडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, राज्य तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी राजे जाधव, डॉ बाळासाहेब थोरात, गोकुळ तांदळे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव प्रा उदय डोंगरे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यातील २७० खेळाडूंनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे डॉ दिनेश वंजारे, सागर मगरे, तुकाराम मेहत्रे, अजय त्रिभुवन, तुषार आहेर, राहुल दणके, शिल्पा नेने, अमृता भाटी आदी प्रयत्नशील आहेत.