
रायगड ः सुभद्रा अनंत पाटील स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात अलिबाग मधील सन्मिल सुशील गुरव, १७ वर्षांखालील गटात अपेक्षा मरभल, ११ वर्षांखालील गटात ईशांत करडे तर १३ वर्षांखालील गटात अर्णब पात्रो आणि मुलींच्या गटात वैघा बैजू यांनी विजेतेपद पटकावले.
अलिबाग येथे भाग्यलक्ष्मी हॉल मध्ये पार पडलेल्या रायगड जिल्ह्या बुद्धिबळ संघटना आयोजित सुभद्रा अनंत पाटील स्मृती चषक स्पर्धा पर्व दुसरे बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १८६ स्पर्धकांनी या स्पर्धेत वेगवेगळ्या ४ गटात आपला सहभाग नोंदेवीला. त्यामध्ये रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई, ठाणे या जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रत्येक गटवार प्रथम तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ बक्षीस दिली गेली.
उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, अलिबाग नगर परिषदेच्या उपाध्यक्षा ॲड मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनाचे अध्यक्ष विलास म्हात्रे, सचिव सुशील गुरव, पदाधिकारी चंद्रशेखर पाटील, सुरेंद्र दातार, तसेच ॲड श्रीराम ठोसर, स्नेहल म्हात्रे, अनंत पाटील गुरुजी, जयप्रसाद पाटील, चेतन पाटील, दर्शन पाटील आणि पाटील परिवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील घोलप यांनी केले. स्पर्धा अलिबागच्या आल्हाददायक वातावरणात अत्यंत चुरशीच्या झाल्या. तेरा वर्षांखालील दोन मुले व दोन मुली राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगडचे प्रतिनिधित्व करतील.
बक्षीस समारंभ स्पर्धा आयोजक अनंत पाटील परिवार आणि रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या पदाधिकारी समवेत पार पडला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अंकित जोशी, आविष्कार मरभल, श्रेयस पाटील, सार्थक मिंडे, अमित कदम, सुशील गुरव, अथर्व दातार यांनी काम पाहिले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्ध मयूर यांचे ॲड मानसी म्हात्रे यांनी केले.
अंतिम निकाल
खुला गट ः १. सन्मिल सुशील गुरव (अलिबाग), २. आकाश कुमार यादव (पनवेल), ३. साई बलकवडे (अलिबाग).
१७ वयोगट ः १. अपेक्षा मरभल (अलिबाग), २. गौतम पवार (गोरेगाव), ३. आर्या जाधव (गोरेगाव).
१३ वयोगट मुले ः १. अर्नब पत्रों (खारघर), २. अमोघ आंब्रे (पनवेल), ३. अद्वय ढेने (पनवेल).
१३ वयोगट मुली ः १. प्रिशा घोलप (महाड), २. वैघ्या बैजू (पनवेल), ३. वेधा बैजू (पनवेल).
११ वयोगट मुले ः १. ईशान कराडे (पनवेल), २. आशुतोष प्रसाद (अलिबाग), ३. स्वर पटेल (गोरेगाव).