
राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटना व महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वी मिनी आणि सहावी चाइल्ड राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन साई प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या श्लोक मुठे व लातूरच्या साई पाटील यांनी सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात येणार आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साईचे सहाय्यक संचालक सुमेध तरोडेकर, महाराष्ट्र फेंसिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष शिवाजी राजे जाधव, डॉ बाळासाहेब थोरात, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव प्रा उदय डोंगरे, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश काठोळे, शेषनारायण लोढे, जिल्हा संघटनेचे डॉ दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, बुलढाणा, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, नागपूर, भंडारा, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यातील २८६ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे प्रास्ताविक डॉ उदय डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन सागर मगरे यांनी केले. दिनेश वंजारे यांनी आभार मानले. या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोंढे, दत्ता गालाले, तुषार आहेर, शिल्पा नेने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, बीड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्याघर, थोरात आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तांत्रिक समिती सदस्य केदार ढवळे, राहुल वाघमारे, विजय गाडेकर, पिराजी कुसळे आदी काम पाहत आहेत. पंच म्हणून व स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी तुकाराम मेहत्रे, अजय त्रिभुवन, राहुल दणके, जयदीप पांढरे, गौरव गोटे, आशिष डांगरे, विश्वजीत कुलकर्णी, अमृता भाटी, विशाल दानवे आदी प्रयत्नशील आहेत.
स्पर्धेचे महत्त्वाचे निकाल
दहा वर्षांखालील इप्पी मुले ः १. श्लोक मुठे (छत्रपती संभाजीनगर), २. हृदयंश शुक्ला (रायगड), ३. अक्षद दौंड (अहिल्यानगर), ४. वीरेन जाधव (छत्रपती संभाजीनगर).
दहा वर्षांखालील इप्पी मुली ः १. साईं पाटील (लातूर), २. प्रसन्ना हनोईबाग (बीड), ३. वसुधा साठे (अहिल्यानगर), ४. हर्षदा पाटील (बीड).