सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा ९१.९९ टक्के निकाल

  • By admin
  • June 28, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा-२०२५ चे निकाल घोषित झाले. यामध्ये कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट निकाल लागला असून मागील १६ वर्षांपासूनची यशाची परंपरा कायम राखली आहे.

यावर्षी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातून अंतिम वर्षातील प्रल्हाद चापे ९४.३४, द्वितीय वर्षामधील क्रिश मेहता ९२.२९, व प्रथम वर्षातील प्रताप मगर ९०.५३, पठाण मो. सामी ९०.५३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून अंतिम वर्षातील माधवी उदावंत ९०.११, द्वितीय वर्षामधील कृष्णा देशमुख ८६.५९, प्रथम वर्षातील युवराज इंगळे ८२.९१, गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
इलेक्ट्रिकल  इंजिनिअरिंग विभागातून अंतिम वर्षातील ओमकार निल ८८.१७, द्वितीय वर्षामधील गायत्री शिनगारे ८७.५३ व प्रथम वर्षातील गौरी किरकणं ८६.२४ तसेच, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीअरींग विभागातून अंतिम वर्षातील धनश्री कुरे ८९.८२, द्वितीय वर्षामधील भक्ती भंडारे ९१.०० व प्रथम वर्षातील पायल साबळे ८८.६५, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून अंतिम वर्षातील मीनाक्षी राठोड ९०.२६, द्वितीय वर्षामधील शेख मो.बिलाल ९०.२८ व प्रथम वर्षातील सार्थक पंडित ८२.६९, आर्टीफिसिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातून अंतिम वर्षातील रिया काकडे ९१.५, द्वितीय वर्षामधील हरिओम शेंगुळे ९१.९३, व प्रथम वर्षातील स्वस्तिश्री स्वर्णकार ९१.००, यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला. 

तसेच अनेक विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्याचप्रमाणे विविध विभागातील १० विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले. यामध्ये मॅथेमॅटिक्स या विषयात ऋतुजा पानखडे, गौरी मोरे, स्वस्तिश्री स्वर्णकार, वेदिका बोडखे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल मध्ये रमण मुळे, मॅनेजमेंट व इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्पुटर अँड इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रल्हाद चापे, प्रोडक्टशन प्रोसेस या विषयामध्ये हरिओम खराबे इत्यादी विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले.

या घवघवीत यशाबाबत छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ शशिकांत डिकले, उप-प्राचार्य प्रा चंद्रशेखर राहणे, प्रा कैलास तिडके, प्रा अनिकेत सोनवणे, प्रा महेश मोरे, प्रा रुपाली पोफळे, प्रा माधव नरंगले, प्रा संदीप मदन, प्रा सोनल बोराखडे, प्रा सागर आव्हाळे, प्रा गिरीश सहाणे, प्रा धनंजय लांब, प्रा भारत धनवडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *