पार्थ, रिधान, आदित्य, अजिंक्य, अस्मिराने पटकावले सुवर्णपदक

  • By admin
  • June 28, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

राज्य स्क्वॉश क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू चमकले

छत्रपती संभाजीनगर ः पुणे येथे महाराष्ट्र स्क्वॉश अकॅडमी उंड्री या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली. 

या स्पर्धेत ज्युनियर मुलांच्या गटात आदित्य घोडके याने सुवर्णपदक तर रेहान बेगने कांस्यपदक पटकावले. मुलांच्या दुहेरी गटात पार्थ गाडेकर आणि अजिंक्य शिवणकर यांनी सुवर्णपदक जिंकून स्पर्धा गाजवली. ज्युनियर मुलींच्या गटात अश्मिरा बेग हिने सुवर्णपदक पटकावत आपला दबदबा कायम ठेवला.  )
११ वर्षांखालील मुलांच्या गटात रिधान गाडेकरने सुवर्णपदक पटकावले. यशोवर्धन राजाळे याने कांस्यपदक तर रुद्र ताठे याने कांस्यपदक जिंकले. ११ वर्षांखालील मुलींच्या गटात ईशा आंबेकर हिने कांस्यपदक पटकावले. 

१३ वर्षाखालील गटात अर्ष पैलवानने कांस्यपदक पटकावले. १३ वर्षांखालील मुलींच्या गटात आराध्या वराडे हिने कांस्यपदक आणि उर्विजा बोर्डे हिने कांस्यपदक पटकावत स्पर्धा गाजवली. 

हे सर्व पदक विजेते खेळाडू विभागीय क्रीडा संकुल येथे वर्ल्ड लेवल वन प्रशिक्षक डॉ रोहिदास गाडेकर, डॉ कल्याण गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित प्रशिक्षण घेतात. या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे, सचिव डॉ दयानंद कुमार, डॉ संदीप जगताप, रणजित भारद्वाज, डॉ कैलास शिवणकर अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *