
नागपूर ः विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे नागपूरच्या उदयोन्मुख प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.
विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे व्हीसीए कोचेस अकादमीच्या प्रस्तावित कोचेस कोर्सचे आयोजन व्हीसीए सिव्हिल लाईन्स येथे होणार आहे. या कोर्ससाठी येत्या १० जुलैपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. या कोर्ससाठी क्रिकेट व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे. बीसीसीआय स्पर्धांमध्ये व्हीसीएचे प्रतिनिधित्व केलेल्या क्रिकेट खेळाडूंना प्राधान्य दिले जाईल. अर्जदार हे फक्त नागपूर शहरातील असावेत.
महिला अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल. क्रिकेट ज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी उमेदवारांना अभियोग्यता चाचणी द्यावी लागेल. इंग्रजीचे कामकाजाचे ज्ञान अनिवार्य आहे. उमेदवाराचे वय सुमारे ३० वर्षे असावे. पात्रता निकषांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे विदर्भ क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केले आहे.