ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचा ड्रॉ जाहीर

  • By admin
  • June 29, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

भारत पाकिस्तानसह ब गटात

नवी दिल्ली ः यजमान भारताला चेन्नई आणि मदुराई येथे २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या एफआयएच हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक स्पर्धेच्या गट ब मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, चिली आणि स्वित्झर्लंडसह स्थान देण्यात आले. स्पर्धेचा ड्रॉ समारंभ एफआयएच मुख्यालयात पार पडला. या टप्प्यात प्रथमच २४ संघ सहभागी होतील.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष तय्यब इकराम हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग आणि हॉकी इंडियाचे महासंचालक आरके श्रीवास्तव यांच्यासह ड्रॉ समारंभाला उपस्थित होते. इकराम यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही पहिल्याच २४ संघांच्या एफआयएच ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या दिशेने प्रवास सुरू करत आहोत ही खूप आनंदाची बाब आहे. उदयोन्मुख राष्ट्रांसह सर्व देशांच्या तरुणांना सक्षम बनवण्याच्या एफआयएच धोरणाचा हा एक भाग आहे आणि ही स्पर्धा या दिशेने पहिले पाऊल असेल.”

हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ म्हणाले, “२४ देशांच्या सहभागासह पहिल्या एफआयएच ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषकासाठी आम्ही गट आखत आहोत, हा हॉकी जगतासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे.” जर्मनी हा ज्युनियर पुरुष विश्वविजेता आहे ज्याने २०२३ च्या अंतिम फेरीत फ्रान्सला २-१ असे हरवून विक्रमी सातवे विजेतेपद जिंकले आहे.

स्पर्धेची गटवारी 

पूल अ : जर्मनी, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि आयर्लंड.

पूल ब : भारत, पाकिस्तान, चिली आणि स्वित्झर्लंड.

पूल क : अर्जेंटिना, न्यूझीलंड, जपान आणि चीन.

पूल ड : स्पेन, बेल्जियम, इजिप्त आणि नामिबिया.

पूल इ : नेदरलँड्स, मलेशिया, इंग्लंड आणि ऑस्ट्रिया.

पूल फ : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कोरिया आणि बांगलादेश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *