नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, नांदेडची विजयी सलामी

  • By admin
  • June 29, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

महाराष्ट्र राज्य सेपक टकरा स्पर्धा

नाशिक ः नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशनच्या मान्यतेने नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात वरिष्ठ गटाच्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये यजमान नाशिक, नागपूर, वर्धा जळगांव या संघांनी आपले साखळी सामने जिंकून विजयी सलामी दिली तर महिलांच्या गटात यजमान नाशिकसह, सोलापूर, वर्धा आणि नांदेड या संघांनी
आपले साखळी सामने जिंकून आपल्या गटामध्ये आघाडी मिळविली आहे.

पुरुषांच्या गटात यजमान नाशिकच्या संघाने अकोला संघावर २-० अशी मात केली. वर्धा संघाने सोलापूर संघाचा २-० असा पराभव करून विजय प्राप्त केला. जळगाव संघाने पुणे संघावर २-० असा विजय मिळविला. नाशिक संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यातही सुंदर खेळाचे प्रदर्शन करून जालना संघाला २-० असे पराभूत करून आपल्या गटामध्ये आघाडी घेतली आहे. या स्पर्धेत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या नागपूरच्या संघाने अमरावती संघावर २-० असा विजय मिळवत आपले विजयी अभियान सुरू केले. 

महिलांच्या गटामध्ये यजमान नाशिकने सहज सुंदर खेळ करत बलाढ्य नागपुर संघावर २-१ असा विजय मिळवून सर्वांना चकित केले. यानंतरच्या सामन्यातही नाशिकच्या महिलांनी सुंदर खेळ करून छत्रपती संभाजीनगर संघावर २-० असा सहज विजय मिळवत बॅड फेरीसाठी आपला मार्ग मोकळा केला. महिलांच्या इतर सामन्यात सोलापूरच्या पुणे संघाचा २-०, वर्धा संघाने अकोला संघावर २-० तर नंदेश संघाने मुंबई संघावर २-० असा विजय मिळवत बाद फेरीकडे आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.

सोमवारी सकाळी काही बाद फेरीचे सामने संपल्यानंतर उपउपांत्य, सामने खेळविले जातील तर दुपारी उपांत्य सामने आणि सायंकाळी अंतिम सामने खेळविले जाणार आहे अशी माहिती तांत्रिक समितीने दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *