
सोलापूर ः सोलापूर जिल्हा खो-खो पंच परीक्षेतील परीक्षार्थी व राज्य खो-खो प्रशिक्षकांचा सत्कार सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे पंचमंडळ सदस्य प्रभाकर काळे व एच डी प्रशालेचे पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या वतीने प्रशिक्षकपदी कुमार गटासाठी किरण स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक मोहन रजपूत तर किशोरी गटासाठी वाडीकुरोली येथील कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक अतुल जाधव आणि पुरुष गटाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी उत्कर्ष मंडळाचे प्रशिक्षक अजित शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच जिल्हा खो-खो पंच परीक्षेतील प्रथम द्वितीय व तृतीय आलेले विजयकुमार मुत्येप्पा बबलेश्वर, शहानवाज इब्राहिम मुजावर व राजू शंकर राठोड यांचाही सत्कार करण्यात आला.
एच डी प्रशालेत राज्य खो-खो पंच परीक्षा एच डी प्रशाला व उत्कर्ष क्रीडा मंडळाचे सहकार्याने आयोजित केली होती. यावेळी धाराशिवचे परीक्षक प्रभाकर काळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एच डी प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगे, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव अजितकुमार संगवे, खजिनदार श्रीरंग बनसोडे, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, सहसचिव मोहन रजपूत, राजाभाऊ शितोळे, तांत्रिक समिती प्रमुख उमाकांत गायकवाड, पंचप्रमुख गोकुळ कांबळे, डॉ शिवानंद तोरवी, सोनाली केत, पुंडलिक कलखांबकर व शिवशंकर राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग बनसोडे यांनी केले.