राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत अंबे स्केटिंग अकॅडमीचे वर्चस्व

  • By admin
  • June 30, 2025
  • 0
  • 40 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः अहिल्यानगर येथे टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमी आयोजित २५व्या खुल्या राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्रातील जालना, सोलापूर, परभणी, जळगाव, बीड, पुणे, अकोला, मुंबई, ठाणे येथील २५० ते ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंबे स्केटिंग अकॅडमीच्या अकरा खेळाडूंनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केली.

या सर्व स्पर्धकांना रोलर रिले स्केटिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक भिकन अंबे यांचे मार्गदर्शन लाभले, रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगरच्या पदाधिकारी सदस्य राधिका अंबे, किशोर जाधव, गणेश बनसोडे, पंकज बोरसे पाटील, ऋषिकेश जाधव, पूजा अंबे व अंबे स्केटिंग अकॅडमीच्या पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

अंबे स्केटिंग अकॅडमीचे पदकविजेते

कनिका मेथी (२ सुवर्ण), दिव्या हंकर (१ रौप्य, १ कांस्य), तनया पडवी (२ सुवर्ण), वीर रोडिया (२ सुवर्ण), नचिकेत जैस्वाल (२ सुवर्ण), साई अंबे (२ सुवर्ण), प्रणय ढाकणे (२ सुवर्ण), तेजस सोनाळकर (२ सुवर्ण), अवधूत थट्टेकर (१ सुवर्ण), अविर कावळे (२ सुवर्ण-कांस्य), रफी पठाण (२ रौप्य).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *