
मलबार हिल क्लब येथे बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन
मुंबई : मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने मलबार हिल क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या मुला-मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत काव्या कुमार, अभिमन्यू शेटे, अनुश्री मोडलींबकर, विवान वायंगणकर, रुद्रा गावडे, आदित्य पडवळ, ओम दाबेकर यांनी विजेते पदाचा मान मिळवला.
या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार येथील अकादमीचे सदस्य असलेले खेळाडू सहभागी झाले होते. अकादमीची ही ११७वी स्पर्धा होती. मलबार हिल क्लबचे सोहम दारुवाला, भैरव सेठ, बॉम्बे जिमखान्याचे कुणाल राव यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. योनेक्स, मलबार हिल क्लबचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला मिळाले. अकादमीचे संचालक मनोहर गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
मुली : ११ वर्षांखालील : काव्या कुमार विजयी विरुद्ध आर्या जोशी, १३ वर्षांखालील : अनुश्री मोडलींबकर विजयी विरुद्ध तनया राणे, १५ वर्षांखालील : रुद्रा गावडे विजयी विरुद्ध सनया ठक्कर.
मुले : ११ वर्षांखालील : अभिमन्यू शेटे विजयी विरुद्ध अगस्त्या समताने, १३ वर्षांखालील : विवान वायंगणकर विजयी विरुद्ध विवान गद्रे, १५ वर्षांखालील : आदित्य पडवळ विजयी विरुद्ध विहान राठी, १७ वर्षांखालील ओम दाबेकर विजयी विरुद्ध शोबीत कर्नक.