
५ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई
मुंबई ः हैदराबाद येथील गच्चीबोली स्टेडियममध्ये पार पडलेल्या आठव्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत एक्सलंट तायक्वांदो अकॅडमी, मिरा रोड, ठाणे येथील खेळाडूंनी भव्य यश संपादन केले.
या स्पर्धेचे उद्घाटन दक्षिणेचा सुपरस्टार अभिनेते सुमन व तेलंगणा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डी सतीश गौड आणि सचिव ए प्रवीण कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत भारतभरातून २००० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीच्या स्पर्धकांनी सहभागी होत सब-ज्युनियर, ज्युनियर आणि सीनियर गटांमध्ये क्युरेगी आणि पूमसे प्रकारांमध्ये आपले कौशल्य दाखवले. ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेअंतर्गत सहभागी झालेल्या एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी एकूण ५ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदकांची घवघवीत कमाई केली.
पूमसे प्रकारातील सुवर्णपदक विजेते
१) अन्विता महेंद्र सावंत, २) स्वरा रंजीत मोहिते, ३) अमृता मिलिंद कुलकर्णी.
क्युरेगी प्रकारातील पदक विजेते
१) मंथन विश्वनाथ वापीलकर (सुवर्णपदक), २) अमृता मिलिंद कुलकर्णी (सुवर्णपदक), ३) स्वरा रंजीत मोहिते (रौप्यपदक), ४) सक्षम किशोर भारुड (कांस्यपदक), ५) अन्विता महेंद्र सावंत (कांस्यपदक).
या घवघवीत यशामागे प्रशिक्षक कांचन गवंडर-आंधोळकर व गजेंद्र गवंडर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि प्रशिक्षण व खेळाडूंची मेहनत आहे. स्पर्धेपूर्वी खेळाडूंनी अथक परिश्रम घेऊन सराव केल्यामुळे हे यश शक्य झाले असे कांचन गवंडर व गजेंद्र गवंडर सांगतात. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक कांचन गवंडर-आंधोळकर व प्रशिक्षक गजेंद्र गवंडर यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली.या स्पर्धेचा पूर्व तयारीसाठी अथक परिश्रम घेऊन खेळाडूंनी स्पर्धेत विविध गटात विजय मिळवला, प्रशिक्षक कांचन गवंडर, पालक अश्विनी सावंत, रुचिता मोहिते यांनी खेळाडूंच्या उत्कृष्ट पदके मिळवल्याबद्दल मीरा रोड स्टेशन येथे सर्व खेळाडूंना पुष्पहार घालून व पेढे वाटून उत्साह साजरा केला.
संघाचे प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व संघ व्यवस्थापक मिलिंद कुलकर्णी, ज्योती भारुड हे देखील या यशात सहभागी होते. सर्व विजेत्या खेळाडूंना व प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या व गौरव केला. त्यात सेंट जॉन्स मॅरेथोमा चर्चचे फादर रेव्ह. नितीन जॉन चाको अचेन, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, निशा नार्वेकर (जिल्हा संघटक, शिवसेना), सचिन मांजरेकर (विभाग प्रमुख, शिवसेना), तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, सचिव मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष निरज बोरसे, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, दुलिचंद मेश्राम, खजिनदार व्यंकटेश करा, अजित घारगे, विजय कांबळे, सतीश खेमस्कर, एक्सलंट तायक्वांदो अकॅडमी चे संस्थापक निरज बोरसे, लता कलवार ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे, उपाध्यक्ष सलिल झवेरी, दीपक मालुसरे, सचिव कौशिक गरवालिया, खजिनदार सुरेंद्र कांबळी, सदस्य प्रमोद कदम, श्रीकांत शिवगण आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.