
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित मोरेश्वर महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विषयाचे प्रोफेसर डॉ पंढरीनाथ रोकडे आणि ॲड हर्षल रोकडे लिखित पुस्तकाचा कव्हर पेज प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए/बीकॉम/बीएससीच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रासाठी भारतीय संविधान या अनिवार्य अभ्यासक्रमाच्या विषयास अनुसरून हा संदर्भ ग्रंथ लिहिला आहे. या संदर्भ ग्रंथासाठी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, विद्यापीठाचे राज्यशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख तथा कुलसचिव प्रोफेसर डॉ प्रशांत अमृतकर, विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक बाळासाहेब डोळे यांच्यासह मान्यवरांनी या पुस्तकासाठी शुभेच्छा संदेश दिला आहे.

डॉ पंढरीनाथ रोकडे यांचे हे १९वे पुस्तक आहे आणि अजून दोन पुस्तके त्यांची प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या पुस्तक प्रकाशन समारंभात भारतातील महाराष्ट्र, उत्तराखंड, काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, छत्तीसगड आदी विविध प्रांतातील अनेक १ हजारच्यावर मान्यवर उपस्थित होते. सदरील पुरस्कार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज व गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुभेदार कुणाल मालुसरे यांच्या हस्ते व मिसेस उत्तराखंड डॉ रूपाली वशिष्ठ (डेहराडून) यांच्या उपस्थितीत झाले.
पुस्तकासाठी मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ ज्यांच्या नावावर ८८१ पेटंट आहे असे नेक्स्ट जनरेशन विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रोफेसर डॉ बी के सरकार,
आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य आचार्य प्रणवकुमार शास्री, राष्ट्रपती पदक विजेता आंतराष्ट्रीय सरोदवादक पंडीत ब्रीज नारायण, सहकार महर्षी भगवानराव पाटील लातूर, कॅनडा येथून या कार्यक्रमास आलेले प्रमुख अतिथी डॉ गुरतेज ब्रार, सुरींदर कुमार, या कार्यक्रमाचे संयोजक व फाऊंडर आरटीबीआर डॉ क्रांती महाजन यांच्या हस्ते या पुस्तकाच्या कव्हर पेजचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांती महाजन यांनी केले. प्रोफेसर डॉ पंढरीनाथ रोकडे यांनी पुस्तक लेखनाविषयीची भूमिका याप्रसंगी विशद केली.