
नाशिक ः नाशिक टेनिस क्रिकेट विभाग प्रमुखपदी निफाडच्या विलास गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन व सातारा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सहविचार सभा क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड सातारा येथे उत्साहात पार पडली. त्यामध्ये नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड यांची नाशिक विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली.
या सभेच्या अध्यक्ष म्हणून भारतीय व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघटनेच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र राज्य महिला डायरेक्टर धनश्री गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष विलास गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोशियन सहसचिव चंद्रकांत तोरणे, धनंजय लोखंडे आदी उपस्थित होते.
या वार्षिक सहविचार सभेमध्ये भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांनी सर्व जिल्हा सचिवांना टेनिस क्रिकेटबद्दल माहिती व नवीन नियम व वार्षिक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे नियोजन सांगितले. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये टेनिस क्रिकेट असोसिएशनचे काम बघता महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांच्या आदेशावरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी टेनिस क्रिकेटचे काम नाशिक जिल्ह्यात उत्कृष्ट केल्याबद्दल त्यांना विभाग स्तरावर उत्कृष्ट काम करण्यात यावे म्हणून नाशिक टेनिस क्रिकेट विभाग प्रमुख म्हणून विलास गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल विलास गायकवाड यांचे भारतीय टेनिस क्रिकेटचे फाउंडर कन्हैया गुजर, महाराष्ट्र राज्य सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे, महाराष्ट्र राज्य महिला डायरेक्टर धनश्री गिरी, धनंजय लोखंडे, विलास गिरी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच निफाड, वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका पल्लवी सानप, सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती भागवत, पत्रकार रामभाऊ आवारे, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती सचिव विनोद गायकवाड, राहुल कुलकर्णी, चेतन कुंदे, दत्तू रायते, श्याम चौधरी, रमेश वडघुले, दीपक भोर, क्रीडा सह्याद्री सदस्य विजय घोटेकर, प्रतिक्षा कोटकर, किर्ती कोटकर, लखन घडमाले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.