
नाशिक ः आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी याची अस्थाना कजाकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
४ ते १० जुलै दरम्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मनमाडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी आपल्या सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. साईराज ८८ किलो वजनी गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत असून ज्युनियर स्पर्धेमध्ये त्याला पदक प्राप्त होण्याची शक्यता आहे.
साईराज परदेशीला वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे आलोकेश बरवा, डी डी शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.