
नाशिक ः हौशी मिक्स बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्राच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयोजन समिती अध्यक्षपदी गणेश पेरे यांची निवड करण्यात आली आहे.
हौशी मिक्स बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन हॉटेल वैशाली, नाशिक येथे केले होते. या सभेचे संपूर्ण नियोजन नाशिक जिल्हा मिक्स बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव आनंद जाधव यांनी उत्तम प्रकारे केले. या सभेला भारतीय मिक्स-बॉक्सिंग महासंघाचे संस्थापक महासचिव राकेश म्हसकर, दुबईचे राहुल भाई, विनायक सकपाळ, प्रणाली पाटील, योगेश पाटील हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वार्षिक सर्वसाधारण सभा हौशी मिक्स बाॅक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रशांत मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ही सर्व साधारण सभा अतिशय खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडली. मिक्स बॉक्सिंग खेळाचा प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त कसा प्रचार, प्रसार व विकास कसा होईल यावर चर्चा झाली. या सभेमध्ये बिनविरोध महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
राज्य कार्यकारिणी मिक्स बॉक्सिंगचे संस्थापक राकेश म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या व्यतिरिक्त या सभेत टेक्निकल डायरेक्टर म्हणून विकास भोईर यांची बिनविरोध निवड भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघात करण्यात आली.
या सर्व निवड झालेल्यांना भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षा आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे, हौशी मिक्स बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे व महासंघाचे चेअरमन सुरज मगर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नूतन कार्यकारिणी
कार्याध्यक्ष – प्रशांत मोहिते (रायगड जिल्हा), उपाध्यक्ष निलेश लिंबे (कोल्हापूर जिल्हा), सचिव नारायण कराळे (अहिल्यानगर जिल्हा), टेक्निकल डायरेक्टर सागर शेलार (पालघर जिल्हा), टेक्निकल अध्यक्ष संदेश नाईक (मुंबई जिल्हा), महाराष्ट्र प्रशिक्षक राजू मोरे (मुंबई जिल्हा), डेव्हलपमेंट इन्चार्ज – रवी बारापात्रे (नागपूर जिल्हा), आयोजन समिती अध्यक्ष गणेश पेरे (बुलढाणा जिल्हा), आनंद जाधव (नाशिक जिल्हा), किसन शिंदे (पुणे जिल्हा), गणेश पाटील (सांगली जिल्हा), आकाश राणे (अमरावती जिल्हा), अनिल साहारे (गोंदिया जिल्हा), अमित पंत (मुंबई उपनगर), नासीर मुलानी (ठाणे जिल्हा), स्वप्नील सोनवणे (नवी मुंबई), रोहन शेवाळे (सचिव -रोहा तालुका), विनोद दाढें (नांदेड जिल्हा).