बुद्धिबळ स्पर्धेत अथर्व मडकरला विजेतेपद 

  • By admin
  • July 3, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

पुणे ः यु एन स्पोर्ट्स आंतरराष्ट्रीय मानांकित ओपन बुद्धिबळ स्पर्धेत अथर्व मडकर याने साडेसात गुणांसह विजेतेपद पटकावले. 

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेने सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये यु इन स्पोर्ट्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन स्पर्धा घेण्यात आली. 

पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम हे होते. पारितोषिक वितरण समारंभ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार मोहनराव देशमुख यांच्या हस्ते पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव राजेंद्र कोंडे व आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे, याप्रसंगी यु इन स्पोर्ट्सचे समन्वयक योगेश रवंदळे, मृणाल पाठक, समन्वयिका डॉक्टर विद्या पाठारे हे मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संगीता जगताप यांनी केले. क्रीडा विभाग प्रमुख डॉ विद्या पाठारे यांनी आभार मानले.

अंंतिम निकाल

१. अथर्व मडकर (७.५ गुण), २. श्रीराज भोसले (७), ३. शाश्वत गुप्ता (७), ४. आदित्य सावळकर (७), ५. प्रथमेश शेरला (७), ६. राहुल संगमा (६.५), ७. दिव्या पाटील (६.५), ८. अमर्त्य गुप्ता (६.५), ९. ऋषिकेश कबनुरकर (६.५), १०. निलय कुलकर्णी (६.५ गुण). 

गटवार पारितोषिक मिळवलेले खेळाडू
सुदीप पाटील, ईश्वरी जगदाळे, अयान सोमाणी, दिशा पाटील, वेदांग असनीकर, वरद गायकवाड, चिराग पाटील, अनिकेत भुनिया, अलौकिक सिन्हा, अमित नाईक, माधव देवस्थळी, विनोदकुमार नायर, हिरण्यमयी कुलकर्णी, शर्वरी कबनुरकर, विहान मेहरा, श्रेयस पाटील, रॅपोसो मॅक्सवेल, चतुर्थी परदेशी, विवान सोनी, ईशान अर्जुन, आयुष जगताप, पार्थ शिंदे, शिवांश कसुकूर्थी, सोमदर्शी मोंडल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *