
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आनंद ठेंगे आणि सागर पवार या दोन क्रिकेटपटूंची रणजी सामन्याच्या संभाव्य संघात निवड झाली आहे.

आनंद ठेंगे आणि सागर पवार यांची यंदाच्या हंगामात खेळविण्यात येणाऱ्या रणजी सामन्याच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. मागील वर्षी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्यांची रणजी सामन्याच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. ५ जुलै २०२५ पासून सोलापूर येथे आयोजित सराव सामन्याकरिता ते सहभागी होणार आहेत.
या निवडीबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राम भोगले, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, पारस छाजेड, जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट सल्लागार समिती अध्यक्ष सचिन मुळे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे सहसचिव शिरीष बोराळकर व कोषाध्यक्ष सुभाष पटेल यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले आणि चालू रणजी सामन्यात निवड होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.