
नवी दिल्ली ः जागतिक बुद्धिबळ विजेता भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याने ग्रँड चेस टूर रॅपिड २०२५ च्या झाग्रेब लेगमध्ये सहाव्या फेरीत नॉर्वेच्या जागतिक नंबर एक मॅग्नस कार्लसनचा काळ्या सोंगट्यांसह पराभव केला. गुकेश १० गुणांसह स्पर्धेत अव्वल स्थानावर आला आहे.
पहिल्या दिवशी तीनपैकी दोन सामने जिंकणाऱ्या गुकेश याने चौथ्या आणि पाचव्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह आणि अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआना यांना पराभूत केले. कार्लसनवर गुकेश याचा हा सलग दुसरा विजय आहे. गेल्या महिन्यात त्याने नॉर्वे बुद्धिबळात कार्लसनचा पराभव केला. गुकेशला पहिल्या सामन्यात पोलंडच्या दुडाने ५९ चालींमध्ये पराभूत केले. त्यानंतर गुकेश याने पुनरागमन केले. त्याने फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजा आणि देशबांधव प्रज्ञनांधाचा पराभव केला.
स्पर्धेत गुकेशचा हा सलग पाचवा विजय आहे आणि आता त्याचे १२ पैकी १० गुण आहेत. रॅपिड प्रकारात तीन फेऱ्या शिल्लक असताना गुकेश याने पोलंडच्या दुडा जान क्रिझ्टोफवर दोन गुणांची आघाडी घेतली आहे. अमेरिकेचा वेस्ली सो सात गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर कार्लसन, नेदरलँड्सचा अनिश गिरी आणि स्थानिक खेळाडू इव्हान सारिक त्याच्यापेक्षा एक गुण मागे आहेत. आर प्रज्ञनानधा आणि अमेरिकेचा फॅबियानो कारुआना पाच गुणांसह सातव्या स्थानावर आहेत. फ्रान्सचा अलिरेझा फिरोजा नौवे आणि उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह दहाव्या स्थानावर आहेत.
गुकेशकडून पराभव झाल्यानंतर मॅग्नस कार्लसन निराश
जगातील नंबर वन खेळाडू, नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशकडून पराभव पत्करल्यानंतर निराश झाला आहे. विश्वविजेता गुकेश याने सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात कार्लसनचा पराभव केला. यापूर्वी, त्याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत क्लासिकल स्वरूपात त्याला पराभूत केले होते. कार्लसन म्हणतो की त्याला आता बुद्धिबळ खेळायला मजा येत नाहीये.
गुकेशने सहाव्या फेरीत काळ्या तुकड्यांसह कार्लसनचा पराभव केला. गुकेशचा कार्लसनवर हा सलग दुसरा विजय आहे. तो १० गुणांसह स्पर्धेत अव्वल स्थानावर आला आहे. या स्पर्धेत गुकेशचा हा सलग पाचवा विजय आहे आणि आता त्याचे १२ पैकी १० गुण आहेत. रॅपिड प्रकारात तीन फेऱ्या शिल्लक आहेत आणि गुकेश याची पोलंडच्या डुडा जान क्रिझ्टोफवर दोन गुणांची आघाडी आहे.
कार्लसन म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला आता बुद्धिबळ खेळायला मजा येत नाहीये. मी खेळत असताना कोणताही प्रवाह नाही. माझा खेळ खराब होत चालला आहे. गुकेश उत्तम खेळत आहे. स्पर्धा अजूनही खूप लांब आहे पण सलग पाच सामने जिंकणे ही काही छोटी गोष्ट नाही.