किदाम्बी श्रीकांतची कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आगेकूच

  • By admin
  • July 4, 2025
  • 0
  • 3 Views
Spread the love

नवी दिल्ली ः भारताच्या किदाम्बी श्रीकांत याने कॅनडा ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पुरुष एकेरी गटात श्रीकांतने टिएन तैपेईच्या वांग पो वेईचा सरळ गेममध्ये पराभव केला.

२०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेता आणि २०२२ च्या थॉमस कप विजेत्या श्रीकांतने जागतिक क्रमवारीत ७१ वांगचा २१-१९, २१-१२ असा पराभव केला.

या वर्षी मे महिन्यात मलेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या जागतिक क्रमवारीत ४९ व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतचा सामना आता अव्वल मानांकित चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन चेनशी होऊ शकतो. श्रीकांत सुरुवातीच्या सामन्यात बहुतेक वेळा पिछाडीवर होता आणि त्याने ५-११ च्या गुणांनी पुनरागमन करून १८-१८ असा गुण मिळवला. त्यानंतर त्याने पुढील चार गुण मिळवले.

दुसऱ्या गेममध्ये वांगने ६-१ अशी आघाडी घेतली, पण श्रीकांतने सात गुण घेत स्कोअर ८-६ असा केला आणि सामन्याचा मार्ग बदलला. त्यानंतर चायनीज तैपेईच्या खेळाडूने पुनरागमन केले आणि स्कोअर १३-१० असा केला, पण श्रीकांतने हार मानली नाही आणि नऊ गुण घेत वांगकडून सामना हिसकावून घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *