
सांघिक सुवर्णपदक पटकावले
यवतमाळ ः १७ वर्षांखालील रोलबॉल वर्ल्ड कप स्पर्धा केनिया येथे झाली. रोलबॉल वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातून स्कूल ऑफ स्कॉलर्स यवतमाळचा माजी खेळाडू जय राजाची याची मुलांच्या संघामध्ये निवड झाली होती. या स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी बजावत सांघिक सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
जय राजाची याला शारीरिक शिक्षक विभाग प्रमुख संजय कोल्हे (राष्ट्रीय प्रशिक्षक) यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रोलबॉल खेळाचे जनक राजू राभाडे, प्रताप पगार, प्राचार्य रिना काळे, उपप्राचार्य जागृती गंडेचा, प्रशासकीय अधिकारी श्रीकांत ठाकरे, सुपरवायझर सायली कशाळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड व रोलबॉल संघटना पदाधिकारी सुशिल कोठारी, विकास टोणे, सचिन भेंडे, जितु सातपुते, अविभाऊ लोखंडे, मुख्याध्यापक मनोज येंडे, जय मिरकुटे, पंकज शेलोटकर, रोशना घुरडे, अभिजित पवार, महेश गहुकार, हर्षा इंगळे आदींनी जयचे अभिनंदन केले आहे.