
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातून उत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट संघटनेतर्फे तालुका प्रमुखांची निवड करण्यात येणार आहे.
राज्य व राष्ट्रीय स्पर्धेकरिता टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एका व्यक्तीची तालुका प्रमुखपदी व सचिवपदी निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा सचिव व विभाग अध्यक्ष विलास गायकवाड यांनी सांगितली.
नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन राष्ट्रीय टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व शालेय टेनिस क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असून जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील खेळाडू असोसिएशन अधिकृत जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धे पर्यंत खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून तालुकास्तरावर तालुका प्रमुख व सचिवपदी म्हणून कार्य करण्यासाठी इच्छुक क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू, क्रिकेट क्लब प्रशिक्षक यांनी जिल्हा संघटनेशी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी सचिव विलास गायकवाड (9921133303) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.