कुलदीप सावंत यांना राज्यस्तरीय विश्वकर्मा कामगार भूषण पुरस्कार

  • By admin
  • July 5, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

धाराशिव ः धाराशिव येथील क्रीडा शैक्षणिक व सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले क्रांतिसूर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेज तसेच विविध असोसिएशनचे सचिव कुलदीप सावंत यांना राज्यस्तरीय विश्वकर्मा कामगार भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कोल्हापूर येथील राज्य गुणवंत कामगार व जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र सेवाभावी संस्थेच्या वतीने कुलदीप सावंत यांना क्रीडा व शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कुलदीप सावंत हे महाराष्ट्र हँडबॉल व डाॅजबाॅल असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य म्हणून काम पाहतात. तसेच धाराशिव जिल्हा हँडबॉल, डाॅजबाॅल, स्क्वॉश रॅकेट व श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधनी असे विविध असोसिएशनचे ते सचिव आणि सदस्य म्हणून काम पाहतात. हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे क्रीडा क्षेत्रात धाराशिव विभागांमध्ये सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच हा पुरस्कार लोकप्रतिनिधी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सावंत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र असे पुरस्कारचे स्वरूप आहे, असे आवाहन अध्यक्ष सुरेश केसरकर व सचिव अच्युत माने यांनी सांगितले आहे ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *