
पुणे ः कोकणस्थ परिवार, पुणेच्या वतीने गुरुवारी ज्येष्ठ क्रीडा संघटक दामोदर गणपत पाटील यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा खास सत्कार सुनील नेवरेकर यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश चव्हाण हे होते. डी जी पाटील यांनी कोकणस्थ परिवारचे माध्यमातून विविध जिल्ह्यामध्ये क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जयश्री दामोदर पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. अजय पाटील यांनी स्वागत केले. अरविंद हेदुकर यांनी प्रास्ताविक केले, गौरांग पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले, रिमा गुढेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वाती पाटील, वृषाली खेडेकर, कल्पिता विचारे, प्रियांका पाटील, आबा दरिपकर, अल्फा चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.