आरोही स्पोर्ट क्लबच्या आदेश रणदिवेची सुवर्ण कामगिरी

  • By admin
  • July 5, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा 

सोलापूर ः पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सोलापूरच्या आरोही स्पोर्ट क्लबच्या आदेश अनिल रणदिवे याने चमकदार कामगिरी बजावत सुवर्णपदक पटकावले. 

राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा विठ्ठल लॉन्स हिंजवडी पुणे येथे पार पडली. या
स्पर्धेसाठी ३५ जिल्ह्यातून सुमारे १४७० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ५७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यात आरोही स्पोर्ट क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवत घवघवीत यश मिळवले.
या स्पर्धेत कार्तिक इंगळे (कांस्य पदक), रणजीत रणदिवे (कांस्यपदक), आदेश अनिल रणदिवे (सुवर्णपदक), अक्षरा अनिल इंगळे (कांस्यपदक), आरजू मुलानी (कांस्यपदक), समर्थ तानाजी घुगे (कांस्यपदक), सोहम शशिकांत भांगे (रौप्यपदक) व शंभूराजे सौदागर राऊत (रौप्यपदक) यांनी शानदार कामगिरी नोंदवत पदकांची कमाई केली आहे.

प्रथम क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंची निवड चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे. आरोही स्पोर्ट क्लबच्या आदेश अनिल रणदिवे याने फायनल मध्ये मुंबईच्या खेळाडूला गोल्डन किक मारत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. सर्व खेळाडूंचे अभिनंदन अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद सोलापूरचे सभापती विजयराज डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, बॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार, सचिव धीरज वाघमारे, प्राचार्य मोरे, मार्गदर्शक संजय शिंदे, अनिल मिरकर, सूर्यप्रकाश मुंडापाठ, सतीश राजहंस, कृष्णा ढोबळे यांनी केले. या खेळाडूंना श्रीकांत पुजारी, रामचंद्र करणवर, ओंकार वागज, बिरुदेव पुजारी, आदित्य बंडगर, साहिल ढगे, सिद्धेश्वर रणदिवे, योगेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *