
सीएसी चेअरमन सचिन मुळे, संतोष बोबडे, आशिष लोकरे, दिलीप माने, राजू काणे, चंद्रकांत रेम्बुर्स यांची प्रमुख उपस्थिती
सोलापूर : येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने यावर्षीपासून वरिष्ठ गटाच्या मुलांच्यासाठी नव्याने डी बी देवधर चषक क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट ७० खेळाडूंची ४ संघात विभागणी करण्यात आली असून त्या संघाना महाराष्ट्राचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू यांची नावे देण्यात आली आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सीएसी चेअरमन सचिन मुळे, एमसीए सहसचिव संतोष बोबडे, सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने तसेच सोलापूर मनपा उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते खेळपट्टीची पूजा करून करण्यात आले.
यावेळी एमसीए अपेक्स कौन्सिल सदस्य तथा सामना समिती प्रमुख राजू काणे, अजय देशमुख, राजमाता अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे चिलवंत, सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु, एमसीए आजीवन सदस्य दिलीप बच्चुवार, सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी प्रकाश भुतडा, राजेंद्र गोटे, संतोष बडवे, संजय वडजे, उदय डोके, संजय मोरे, मोहन बारड, स्नेहल जाधव, किरण मणियार, किशोर बोरामणी, मिलिंद गोरे, राजू रंगम, सारिका कुरनूरकर यांच्यासह रणजी निवड समिती प्रमुख अक्षय दरेकर, रोहित जाधव, किरण आढाव, अमेय श्रीखंडे, संघ व्यवस्थापक मंदार देडगे, चार संघाचे प्रशिक्षक अमित पाटील, सत्यजीत जाधव, दिगंबर वाघमारे, अमित कुष्ते आदी मान्यवर आणि सोलापूर शहरातील विविध क्रिकेट क्लब मधील खेळाडू आणि क्रीडा प्रेमी, पालक, महिला सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूरचे बीसीसीआय पंच अनिश सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक करताना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्याची संधी सोलापूरला दिल्याचे सांगत जिल्हा संघटनेच्या वतीने एमसीएचे आभार व्यक्त करण्यात आले. पाहुण्याचे स्वागत म्हणून सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष दिलीप माने यांच्या हस्ते सचिन मुळे, एमसीए अपेक्स कौन्सिल सदस्य यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
सीएसी चेअरमन सचिन मुळे यांनी देवधर ट्रॉफी सुरू करण्यामागचा उद्देश सांगितला. तसेच हे सामने सोलापुरात का घेतले याचे श्रेय, महत्व व्यक्त करताना सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे कायम लाभणारी मोलाचे सहकार्य, मदत तसेच इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचे वैशिष्ट्य आणि नुकतेच सोलापूर मनपाच्या वतीने स्टेडियम हे पुढील ३० वर्षांसाठी एमसीएला दिल्याबद्दल आभार व्यक्त करत उपस्थित खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांनी देखील स्पर्धा आयोजनाची संधी सोलापूरला दिल्याबद्दल एमसीएचे आभार मानले आणि यापुढे देखील एमसीए देतील जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याची हमी दिली. इंदिरा गांधी पार्क स्टेडियम सोबतच दयानंद कॉलेजच्या मैदानावर देखील सामने होणार असून ३ दिवसीय एकूण ६ सामने होणार असल्याचे सांगताना निवड समिती सदस्य रोहित जाधव यांनी इतर दोन संघ सदू शिंदे, सदानंद मोहोळ यांची नावे असल्याचे सांगितले.