
पुणे ः जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने बिशकेक (किर्गिस्तान) येथे दिनांक ७ ते १३ जुलै दरम्यान होणाऱ्या २० वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघटनेच्या वतीने प्रा दिनेश गुंड यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तांत्रिक अधिकारी म्हणून निवड होण्याची ही त्यांची ६४ वी वेळ आहे. जागतिक कुस्ती संघ*टनेचे दिनेश गुंड हे प्रथम श्रेणीचे पंच असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या २० वर्षात त्यांनी आपल्या कामगिरीचा विक्रम नोंदविला आहे. सन २००३ पासून आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा प्रमुख, निवड समिती प्रमुख, पंचाना प्रशिक्षण देणे या कामांमध्ये त्यांचे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील योगदान खूप मोलाचे आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, सरचिटणीस योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, उपाध्यक्ष संजय शेटे, सुनील चौधरी, सुनील देशमुख, मेघराज कटके मारुती सातव यांनी अभिनंदन केले.