
सोलापूर ः नाशिक येथे सुरू असलेल्या मिनी व चाइल्ड राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी सोलापूरच्या २० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या १७व्या मिनी व ६व्या चाइल्ड राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत सोलापूरच्या खेळाडूंनी २ सुवर्ण, २ रौप्य व ९ कांस्य अशी तेरा पदके प्राप्त केली होती. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यास वयोगट १२ मध्ये मुलांच्या संघास व वयोगट १० मध्ये मुलींच्या संघाने विजेतेपद प्राप्त केले होते. या कामगिरीवर सर्व पदकप्राप्त खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. सर्व खेळाडूंना ऑल स्टार क्लबचे पवन भोसले, सोहम साठे, वेदांत पवार व श्रुतिका चव्हाण व समर्थ स्पोर्ट्स अकॅडमीचे अक्षय माने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या सर्व खेळाडूंचे महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष सतेज पाटील, सचिव डॉ उदय डोंगरे, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश काटूळे, जिल्हा सचिव दीपक शिंदे, सदस्य अनिल पाटील, जितेंद्र पवार व अप्पू गोटे यांनी अभिनंदन केले.
निवड झालेले खेळाडू
वयोगट १२ मुले : आरव भोसले, रजत वानकर, श्रीराम मोरे, ओमराजे शिंदे, आयुष अळ्ळिमोरे व सुयश सुरवसे, सारीष शटगार, सार्थक शिंदे, स्वराज पाटील व नील सुरवसे, विश्व कांबळे व विघ्नेश माने.
मुली : तेजस्वी साखरे, साईलीला पुलगम, आराध्या साखरे, साई शिंदे, संस्कृती चडचणकर, संस्कृती बाबर, सईलीला पुलगम, वरद ताटे, सौरभ लोणारी व नील सुरवसे.