
एजबॅस्टन् ः भारतीय संघाचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिल याने एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतके झळकावून अनेक नवे विक्रम रचले आहेत आणि जे आतापर्यंत भारतीय क्रिकेटमधील कोणत्याही खेळाडूला करता आलेले नाहीत. या कसोटीत गिल याे तब्बल ४३० धावा काढून एक नवा इतिहास रचला आहे.
शुभमनने एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात २६९ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून १६१ धावा झाल्या. यासह गिलने या सामन्यात ४३० धावा केल्या आहेत. त्याच वेळी गिलने भारतीय क्रिकेटमधील दोन महान कर्णधारांना, सौरव गांगुली आणि एमएस धोनी यांना एकाच झटक्यात मागे टाकले. गिल एका डावात आणि कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार बनला आहे.
शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात दोन्ही डावात एकूण ४३० धावा केल्या, तर त्याच्या बॅटमधून ११ षटकारही मारण्यात आले. यासह, शुभमन गिल आता भारतीय कर्णधार म्हणून कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर होता, ज्याने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकूण ६ षटकार मारले होते. याशिवाय शुभमन गिल भारतीय कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू देखील बनला आहे. एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात गिलने १६१ धावा केल्या, तर त्याच्या बॅटमधून एकूण ८ षटकारही दिसले. या प्रकरणातही गिलने धोनीचा विक्रम मोडला आहे.
भारतीय कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
शुभमन गिल – ११ षटकार (वि इंग्लंड, वर्ष २०२५)
एमएस धोनी – ६ षटकार (वि श्रीलंका, वर्ष २००९)
एमएस धोनी – ६ षटकार (वि ऑस्ट्रेलिया, वर्ष २०१३)
एमएस धोनी – ६ षटकार (वि ऑस्ट्रेलिया, वर्ष २००८)
एमएस धोनी – ५ षटकार (वि वेस्ट इंडिज, वर्ष २०११)
रोहित शर्मा – ५ षटकार (वि वेस्ट इंडिज, वर्ष २०२३)
सौरव गांगुली – ५ षटकार (वि न्यूझीलंड, वर्ष २००३)