
विश्वविजेता डी गुकेश तिसऱ्या स्थानावर
नवी दिल्ली ः जगातील नंबर वन मॅग्नस कार्लसन याने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो एक फेरी शिल्लक असताना सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा जिंकून जगातील सर्वोत्तम आहे. तर सध्याचा विश्वविजेता डी गुकेश तिसऱ्या स्थानावर राहिला.
नऊ फेरीच्या रॅपिड स्पर्धेत गुकेशपेक्षा चार गुणांनी पिछाडीवर राहिल्यानंतर, कार्लसनने ब्लिट्झ प्रकारात त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि पहिल्या टप्प्यात नऊ पैकी ७.५ गुण मिळवले. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या आठ सामन्यांपैकी चार गुण मिळवणे त्याला स्पर्धेत आणखी एक विजय मिळवून देण्यासाठी पुरेसे होते.
गुकेशने रॅपिड प्रकारात १४ गुणांसह चांगली सुरुवात केली होती परंतु ब्लिट्झ प्रकारात त्याच्या पहिल्या नऊ सामन्यांमधून फक्त १.५ गुण मिळवून त्याची लय गमावली. कार्लसनने २२.५ गुणांसह स्पर्धा संपवली आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या वेस्ली सोपेक्षा २.५ गुणांनी पुढे होता.
गुकेश अखेर १९.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. कार्लसनने १७,५००० अमेरिकन डॉलर्सच्या बक्षीस गटातून ४०,०००, वेस्लीने ३०,००० आणि गुकेशने २५,००० जिंकले. भारताचा आर प्रज्ञानंद १५ गुणांसह नवव्या स्थानावर राहिला.