
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे गुणवंत कबड्डीपटूंचा गौरव
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने गुणवंत व क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कबड्डी खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या सत्कार समारंभाचे उद्घाटन माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ५० वर्षांपासून खेळासाठी काम करणारे भीष्म पितामह डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर प्रो-कबड्डी खेळाडू सुनील दुबिले व सुरेश जाधव यांचा देखील गुणगौरव करण्यात आला.

तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाकडून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उज्ज्वल कामगिरी केलेल्या खेळाडूंचा तसेच पुणे येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेमध्ये पदक विजेते खेळाडूंचा गुणगौरव सोहळा पार पडला. या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी महापौर नंदकुमार घोडेले, कबड्डी असोसिएशनचे आजीव अध्यक्ष डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, अध्यक्ष अजय पाथ्रीकर, कार्याध्यक्ष गणेश चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, उपाध्यक्ष रमेश पवार, कल्याण लघाने पाटील, त्रिंबक पाथ्रीकर, अशोक हंगे, राजपाल राठोड, सुभाष बढे, डॉ बाळासाहेब पवार, डॉ संदीप जगताप, गोविंद शर्मा, जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारे कबड्डीपटू, तसेच जिल्ह्यातील सर्व कबड्डी क्लबचे अध्यक्ष आणि सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अजय पाथ्रीकर, सचिव डॉ माणिक राठोड, विजय वानखेडे, विठ्ठल शेळके, मारुती फुलारी, सुरज आहेर, केतन गायकवाड, योगेश गांगर्डे, कृष्णा पांढरे, वैभव गोरे, सुनील गोरे, बळवंत पाटील, योगेश गांगर्डे, कृष्णा राठोड, विकास चव्हाण, गणपत पवार, ज्ञानेश्वर सावंत, भाऊसाहेब वेरुळे, अमोल काळे, बाबासाहेब माने, दिगंबर भोसले, शिवराज जाधव यांचे विशेष योगदान होते. त्यांच्या समन्वयातूनच हा कार्यक्रम अत्यंत नेटका, प्रेरणादायी आणि यशस्वीरीत्या पार पडला.