
छत्रपती संभाजीनगर ः वारकऱ्यांचा श्वास असलेल्या पंढरीच्या वारीची महती सांगावी तितकी कमीच आहे. वारी ही बघण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. पायी जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच छत्रपती संभाजी नगरातील सायकप्रेमींनी छोटे पंढरपूर (वाळूज) अशी ३० किमीची आषाढी एकादशी सायकल वारी पूर्ण केली.
या वारीमध्ये ७० सायकलपटूंनी सहभाग नोंदविला. वारीची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता उद्योगपती विवेक देशपांडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सीडीसीए सायकल बेट येथून सुरुवात झाली. वारीमध्ये सायकलटूंनी रिंगण करून सर्वांचे लक्ष वेधले. संघटनेतर्फे सायकल वारीचे हे चौथे वर्ष होते. २०, २१, २२ जून दरम्यान मोठे पंढरपूर सायकल वारीमध्ये सहभागी झालेले सायकल वारकऱ्यांना संघटनेतर्फे स्मृतिचिन्ह देण्यात आले.
सायकल वारीचा मार्ग सीडीसीए सायकल बेट, महावीर चौक, नगर नाका, विठ्ठल रुक्माई मंदिर पंढरपूर (वाळूज) व परत सीडीसीए सायकल बेट असा होता. या सायकल वारीमध्ये संघटनेचे सायकलपटू चरणजित सिंग संघा, निखिल कचेश्वर, आर्णीका कचेश्वर, अतुल जोशी, साई जोशी, दीपक कुंकूलोळ, आरव कुंकूलोळ, मनीष खंडेलवाल, मनप्रीत कौर संघा, पोपट आळंजकर, अमोल सोमवंशी, हर्षद अदालकोदा, महादू ठोंबरे, विजय पाटोदी, रमेश अवचार, सुनील कोंडेवार, अनिल देशमुख, नरेंद्र भालेराव, अनय भालेराव, मोहन उन्हाळे, चांगदेव माने, सयाजी पाटील, वंदना सवाईराम, गणेश तुमगेंवार, मनोज बोढारे, सागर नेरकर, संतोष हिरेमठ, अंकुश केदार, अमेय कुलकर्णी, सचिन भंडारे, अनिल सुलाखे, गिरीश गोडबोले, संस्कृती गाढवे, वैशाली आघाव, वैशाली जाधव, सोनम शर्मा, रविंद्र जोशी, ध्येयश झिरापे, शिवाजी झिरापे, डॉ प्रफुल जटाळे, संदीप शिंदे, अजय पांडे, रमेश एम.सोनटक्के, प्रफुल्ल मोहरील, प्रसाद जोशी, उषा केदार, शिवाजी खांडरे, चंद्रकांत कदम, डॉ अशोक बोलकर, आकाश टाके, यशोधन गाडेकर, हर्षद खांडरे, जयश्री घुले, कार्तिक आढावे यांनी सहभाग घेतला होता.