
छत्रपती संभाजीनगर ः रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित रोलर रीले स्केटिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर संलग्नित, स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने विठ्ठल चषक ४२ व्या खुल्या राज्य रिले स्केटिंग स्पर्धा आषाढी एकादशी निमित्त ६ जुलै रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, पुणे, मुंबई, जळगाव, भुसावळ, नागपूर, अकोला, जालना, बीड, अहमदनगर, बार्शी तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील तब्बल ३०० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई तसेच शिवकला नेत्रालय संस्थापक डॉ हिना ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड श्रीकांत वीर, डॉ उमेश रायते यांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवत मार्गदर्शन केले.
या संपूर्ण स्पर्धा रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे संस्थापक सचिव भिकन अंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, ज्ञानेश्वर दळवी, सुनीता घुगे, राधिका अंबे यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेदरम्यान सूत्रसंचालनाची भूमिका अमृत बिऱ्हाडे यांनी पार पाडली.
आषाढी एकादशीच्या दिवशी आयोजित स्पर्धेत स्पर्धकांचा व पालकांचा प्रचंड प्रतिसाद व उत्साह संपूर्ण स्पर्धेचे वातावरण दिंडीमय झाले होते. स्पर्धेदरम्यान ऑफिशियल म्हणून पूजा अंबे (छत्रपती संभाजीनगर), धनंजय पाटील (धुळे), स्वरूप पाटील (कोल्हापूर), संजय पाटील (जळगाव), शेख मुनावर (वैजापूर), दीपेश सोनार (जळगाव), साई अंबे (छत्रपती संभाजीनगर), गणेश रोडे (सोलापूर), रवींद्र मिसाळ (नागपूर), रोशनी काटेकर (चंद्रपूर), समाधान चांदणे (सोलापूर), विजय सालोडे (यवतमाळ) यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील विजेते खेळाडू ऑल इंडिया रीले स्केटिंग स्पर्धेसाठी पात्र ठरले व त्यांची शिमला येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली.
या स्पर्धेत अविर कावळे, श्रेयस म्हस्के, आरव नायर, अव्यांत देशमुख, अंश गाडे, सोजल रणदिवे, नारायण कुलकर्णी, अंश शेलार, आराध्य ठुबे, राजवर्धन सिंह चौहान, मनस्वी मखाने, कनक त्रिवेदी, मानस देऊळगावकर, मनन सेठिया, समर्थ इंगळे, तनया तडवी, निहारिका नैनाव, स्वरा लड्डा, शर्वरी यादव, कनिका मेथी, श्रेया म्हस्के, सुवर्ण सराफ, आर्यन चांदणे, रोमीर देशमुख, अथर्व चौधरी, नील बागमार, गौरी जाधव, ध्रुव जैस्वाल, जय देसाई, हरिओम कानव, युवराज पौंड, रघुवीर महाजन, अगम्य रगडे, राधा चव्हाण, मिष्टी सदानंद वीर रोडिया, निधीश शिरसाट, इशिका साबळे, भावेश गुरव, रियांश बन्सल, वसुधा पाटील, विश्व ढोरे, पार्थ राजपूत, धैर्य देवरे, अधिरा राजपूत, मिन्नती सुराणा, यथार्थ सरुक, दिशांत शिर्के, सौम्यक पाटील, ईशान जावळे, प्रणय माळी, तीर्थराज पाटील, सावली खताळ, चेतना धक्कड, आराध्या पवार, रोनक देवरे, शौर्य तावडे, श्रीराम बोरसे, आराध्या जितेकर, परी सूर्यवंशी, सारा राजपूत, कृष्णा खडसे, भूपेंद्र शार्दुल, प्रभास मिसाळ, सुवर्ण ढाके, खुश बोडे, मिथिलेश ठाकूर, रुही मिसाळ, राजली देसाई, सारा बेहरे, शौर्या जाधव, यश पाटील, यश हिवारकर, हार्दिक काटेकर, लकी पायघन, चिरायू मेहता, अनुष मारगोलवाल, आराध्या पाटील, प्रथमेश इंगळे, अवधूत पाठक, वेदांत राजपूत, सानवी सोनवणे, अंकुश बनसोड, अनुराग खैरनाल, यश दामधर, दिव्या हंकर यांनी आपापल्या प्रकारात घवघवीत यश संपादन केले.