
छत्रपती संभाजीनगर ः अखिल भारतीय खो-खो फेडरेशनच्या खजिनदारपदी छत्रपती संभाजीनगर येथील गोविंद शर्मा यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्त छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकर काका मुळे यांनी त्यांचा शाल, आणि रोपटे देऊन सत्कार केला आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील उपस्थित होते.