२६, २७ जुलै रोजी आयोजन, संयोजक सुरेश मिरकर यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर ः दि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व २७ जुलै रोजी जिल्हा योगासन निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धेच्या दोन दिवस अगोदर महाराष्ट्र योगासन स्पोर्ट संघटनेने दिलेल्या https://forms.gle/GAz9q9HY1ZHYGkwF9 या गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या दिवशी वेळेवर नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. खेळाडूंनी स्पर्धेसाठी सकाळी साडेआठ वाजता, गरवारे कम्युनिटी सेंटर एन ७, सिडको येथे उपस्थित राहावे.
ही स्पर्धा दहा प्रकारात होईल. त्यात ट्रॅडिशनल योगासन, आर्टिस्टिक योगासन सिंगल, आर्टिस्टिक योगासन पेअर, रिदमिक योगासन पेअर, फॉरवर्ड बेंड इंडिव्हिज्युअल इव्हेंट, बॅक बेंड इंडिव्हिज्युअल इव्हेंट, हॅन्ड बॅलेन्स इंडिव्हिज्युअल इव्हेंट, लेग बॅलेन्स इंडिव्हिज्युअल इव्हेंट, ट्विस्टिंग बॉडी इंडिव्हिज्युअल इव्हेंट, सुपाइन इंडिव्हिज्युअल इव्हेंटिसिनयर या प्रकारांचा समावेश आहे. सीनियर एबीसी गटातील खेळाडू आर्टिस्टिक योगासन सिंगल, आर्टिस्टिक योगासन पेअर, रिदमिक योगासन पेअर या इव्हेंटमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत.
सब ज्युनियर, ज्युनियर व सीनियर गटाची स्पर्धा २६ जुलै रोजी होईल. सीनियर एबीसी गटातील खेळाडूंची स्पर्धा २७ जुलै रोजी होतील. स्पर्धा मुले व मुलींसाठी स्वतंत्र गटात होईल. स्पर्धक एक किंवा दोन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतात अशी माहिती संयोजक सचिव सुरेश मिरकर यांनी दिली.