
श्रुती, धनश्री, साक्षी, संजनाला पदके
नाशिक ः महाराष्ट्र राज्यस्तरीय कॅनोईंग आणि कयाकिंग अजिंक्यपद स्पर्धेत सायखेडा महाविद्यालयाच्या बोट क्लबच्या खेळाडूंची दमदार कामगिरी राहिली.
१६ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय कॅनोईंग अणि कयाकिंग व ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा सांगली जिल्ह्यातील बिरनाळ तलाब जत येथे नुकतीच झाली. या स्पर्धेत सायखेडा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी श्रुती ताजने, धनश्री मोगल, साक्षी गोडसे व संजना दीक्षित यांनी कयकिंग के-४ २०० मीटर या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच संजना दीक्षित व श्रुती ताजणे यांनी (के २) २०० मीटर मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या शानदार यशाने महाविद्यालयाचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरले. विजयी खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. खालकर, उपप्राचार्य, शिक्षक व सर्व कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ धोंडगे व अरुण दराडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.