
बीड ः देहरादून, उत्तराखंड येथे १८ वर्षांखालील राष्ट्रीय रग्बी स्पर्धा संपन्न होणार आहेत. या निमित्त नुकत्याच पुणे येथे १८ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय संघाची निवड चाचणी संपन्न झाली. या चाचणीतून आदिती लोंढे व कीर्ती जाधव या बीडच्या दोन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
या निवड चाचणीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ६० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विविध चार टप्प्यात १५ दिवस खेळाडूंच्या सर्व कौशल्यांची चाचणी आणि सराव घेण्यात आला. बीड जिल्ह्यातील चार मुली खेळाडूंनी या चाचणीत सहभाग घेतला होता. शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन मुली खेळाडूने अतिशय सुरेख खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले.
बीडच्या आदिती सखाराम लोंढे आणि कीर्ती किरण जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात समावेश करण्यात झाला. दोन्ही खेळाडू मोरया क्रीडा मंडळाच्या मैदानावर वर्षभर सराव करतात. मोरया क्रीडा मंडळ बीडचे संस्थापक अध्यक्ष तसेच बीड जिल्हा रग्बी कार्याध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक नितीन येळवे (8208444836), कारागृह पोलिस तसेच रग्बी प्रशिक्षक शोएब खाटीक, तसेच मंडळाचे सचिव अशोक चौरे यांनी या खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
तसेच या कामगिरीबद्दल बीड जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष इसाक शेख, सचिव महेश घुले, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, कार्याध्यक्ष नितीन येळवे, कारागृह पोलिस तसेच प्रशिक्षक शोएब खाटीक, प्रशिक्षक अशोक चौरे, भगवानराव बागलाने, बाळासाहेब जाधव, शिवराज देवगुडे, अप्पासाहेब शिंदे, तसेच बीड जिल्हा रग्बी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय रग्बी खेळाडू, राज्य खेळाडू इतर सर्व पदाधिकारी आणि समस्त मोरया क्रीडा मंडळ परिवार बीड आदींनी शुभेच्छा दिल्या.