
छत्रपती संभाजीनगर ः पीपल्स एज्युकेशन सोसायटी (मुंबई) या संस्थेचा ८० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
या वर्धापन दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पीईएस संस्थेचे सदस्य आणि डॉ बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पीईएस संस्थेचे अध्यक्ष व ट्रस्टी डॉ एस पी गायकवाड हे उपस्थित होते. या वर्धापन दिना निमित्त पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील गुणवंत विद्यार्थी आणि राष्ट्रीय आणि विद्यापीठ संघात स्थान मिळविलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
गुणवंतांमध्ये मुलींनी बाजी मारली. त्यात एमपीएडच्या स्मिता बगाटे, पगारे तेजस्विनी, काळभोर आरती यांनी ८४.२ टक्के गुण संपादन केले आहे. तसेच बीपीएडच्या उभे तन्वी, सोळंके पिज, वड्डे आशा मालू या मुलींनी ८३.९ टक्के गुण संपादन केले आहेत. प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, पुस्तक आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच आंतर विद्यापीठ व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधे पारितोषिक प्राप्त केलेल्या १४ खेळाडूंचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यात तेजस गायकवाड (लॉन टेनिस), प्रतीक्षा डामसे (क्रिकेट), स्वरूप कोठावळे (तायक्वांदो), अमान शर्मा (बास्केटबॉल), तुषार शर्मा (बॅडमिंटन), सौरव दांडगे (बॉक्सिंग), मोनाली धनगर (बॉक्सिंग), अनिकेत पोखरकर (आर्चरी), धनंजय नागपुरे (रायफल शुटींग), विक्की वाहुळकर (सॉफ्टबॉल), प्रथमेश शिंदे (तायक्वांदो), तन्वी उभे (खो-खो) या खेळाडूंचा समावेश आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी यांनी केले, प्रा मंगेश डोंगरे, प्रा राजेंद्र पठानिया, प्रा संतोष कांबळे, प्रा जी सूर्यकांत, ग्रंथपाल डॉ श्यामला यादव, अनिल बागुल, अक्षय दाणे, मुर्तुजा बेग, सुनील शिंदे, पंकज सोनवणे या सर्वांनी कौतुक व अभिनंदन केले.