फेडररचा विक्रम मोडत जोकोविच उपांत्य फेरीत

  • By admin
  • July 10, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

नोवाक जोकोविचने विम्बल्डन स्पर्धेत रचला नवा इतिहास रचला

विम्बल्डन ः सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविच याने इटलीच्या फ्लेव्हियो कोबोलीला हरवून विक्रमी १४ व्यांदा विक्रमी उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि विक्रमी आठव्यांदा विम्बल्डन जेतेपद जिंकण्याच्या एक पाऊल जवळ आहे.

नोवाक जोकोविचने आतापर्यंत २४ ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. त्यात ७ विम्बल्डन जेतेपदे आहेत. यासह, जोकोविचने रॉजर फेडररचा विक्रमही मोडला आहे. यापूर्वी, जोकोविच आणि फेडरर दोघांनीही १३ वेळा विम्बल्डन सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम केला होता. आता जोकोविचने फेडररला मागे टाकले आहे.

क्वार्टर फायनलमध्ये फ्लेव्हियो कोबोलीने पहिला सेट जिंकण्यात यश मिळवले पण जोकोविचने शानदार पुनरागमन केले आणि सामना जिंकला. त्याने फ्लेव्हियो कोबोलीचा ६-७ (६), ६-२, ७-५, ६-४ असा पराभव केला. या सामन्यापूर्वी जोकोविच यानेही अशा प्रकारे विजय मिळवला होता. शेवटच्या १६ सामन्यात अॅलेक्स डी मिनौरकडून पहिला सेट गमावल्यानंतर त्याने शानदार पुनरागमन केले आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये जोकोविचचा सामना आता २३ वर्षीय जॅनिक सिनरशी होईल.

जोकोविचपूर्वी स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराजने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. कार्लोस अल्काराजने ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीचा सरळ सेटमध्ये पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. आता सेमीफायनलमध्ये अल्काराजचा सामना अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झशी होईल.

विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पहिल्यांदाच पोहोचली
महिला एकेरीत पोलिश टेनिस स्टार इगा स्विएटेकने विम्बल्डन २०२५ मध्ये नवा इतिहास रचला आहे. बुधवारी तिने १९ व्या मानांकित लुडमिला सॅमसोनोव्हाला सरळ सेटमध्ये हरवून पहिल्यांदाच या प्रतिष्ठित स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाच वेळा ग्रँड स्लॅम विजेती स्विएटेकने क्वार्टरफायनल सामन्यात सॅमसोनोव्हाला ६-२, ७-५ असे हरवले. २४ वर्षीय स्विएटेक आता उपांत्य फेरीत स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकशी लढेल. बेलिंडा बेन्सिक हिने क्वार्टर फायनलमध्ये रशियाच्या मीरा आंद्रेवा हिला हरवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.

स्विएटेकने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत चार फ्रेंच ओपन आणि एक यूएस ओपन जेतेपद जिंकले आहे, परंतु विम्बल्डनमधील तिचा प्रवास आव्हानात्मक राहिला आहे. यापूर्वी, ती २०२३ मध्येच येथे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचू शकली. तथापि, ज्युनियर स्तरावर तिने २०१८ मध्ये विम्बल्डन जेतेपद जिंकले.

विम्बल्डन पुरुषांच्या उपांत्य फेरीत सर्वाधिक वेळा पोहोचलेले खेळाडू

१४ : नोवाक जोकोविच (२००७, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१५, २०१८, २०१९, २०२१, २०२२, २०२३, २०२४, २०२५)

१३ : रॉजर फेडरर (२००३, २००४, २००५, २००६, २००७, २००८, २००९, २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९)

११ : जिमी कॉनर्स (१९७४, १९७५, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, [१९८२, १९८४, १९८५, १९८७)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *