
विद्यापीठाचे क्रीडा संचालक सचिन देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय व ड्रॉप रोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन आठवड्यांचे ड्रॉप रोबॉल प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजन करण्यात आले आहे.
या अभ्यासक्रम उद्घाटन प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ सचिन देशमुख हे उपस्थित होते. यावेळी सचिन देशमुख यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे महत्व सांगितले. त्याबरोबर विद्यापीठात नियमानुसार कसे समाविष्ट करता येईल याबद्दल असे आश्वासन दिले.
शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मकरंद जोशी यांनी नवीन खेळाचे प्रसार-प्रचार कशा पद्धतीने केल्याने त्याचे विद्यापीठात समाविष्ट करता येईल याची सविस्तर माहिती दिली.
आयक्यूएसीचे समन्वयक डॉ शत्रुजंय कोटे यांनी ड्रॉप रोबॉल प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयक्यूएसी अंतर्गत घेतल्याने या खेळाचे विकास होईल या संदर्भात माहिती दिली. अॅक्टिव्हिटी इन्चार्ज डॉ सिद्दीकी, डॉ माणिक राठोड, डॉ अब्दुल वहीद, ग्रंथपाल डॉ पल्लवी मुंढे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ सागर कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक करताना डॉ मुरलीधर राठोड यांनी ड्रॉप रोबॉल खेळाची सुरुवात कधीपासून झाली आणि आज कोणत्या स्तरांवर हा खेळ आहे याची सखोल माहिती दिली. गणेश राठोड यांनी आभार मानले.
यावेळी अभ्यासकमासाठी ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच सचिन चव्हाण, गोपाल आढे, सौरभ चव्हाण, अरविंद चव्हाण उपस्थित होते.