साडेचार वर्षाच्या वल्लभ कुलकर्णीची लक्षवेधक कामगिरी

  • By admin
  • July 10, 2025
  • 0
  • 68 Views
Spread the love

एकाचवेळी २१ खेळाडूंशी सामना, १२  विजय, पाच ड्रॉ, चार डावांत पराभूत

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रतिभावंत बुद्धिबळपटू साडेचार वर्षाच्या वल्लभ कुलकर्णी याने तब्बल एकाच वेळेस २१ खेळाडू सोबत लढत दिली.

सायमलटेनियस चेस हा जगातील सर्वात अवघड प्रकार मानला जातो. यामध्ये खेळाडूंच्या सर्व क्षमतेचा कस लागतो. प्रत्येक बोर्डवरील लवकर आकलन करून पुढील चाल ठरवावी लागते. खेळाडूकडे अत्यंत कमी वेळ असतो आणि जलदगतीने निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी विविध चालींचे परिपूर्ण नियोजन असावे लागते. त्याच प्रमाणे प्रचंड आत्मविश्वास लागतो.

वल्लभ कुलकर्णी याने एकाच वेळेस २१ मुलांसोबत खेळण्याचे आव्हान स्वीकारून हा पराक्रम केला. यामध्ये अथर्व देशपांडे, रिशान सानप, शौर्य स्वामी, दक्ष स्वामी, अर्णव पारसेवार, रणवीर दाभाडे, अहना प्रसाद, वेदश्री अष्टपुत्रे, जन्मेजय तपसे, रसराज निकम, अथर्व दुबे, शाश्वत सोनवणे या सारख्या चांगल्या खेळाडूंसोबत यशस्वी लढत दिली. 

या संघर्षपूर्ण लढतीमध्ये आश्चर्यकरपणे विविध ओपनिंगचा सामना वल्लभने केला. मिडल गेममध्ये प्रत्येक बोर्ड वरील स्थिती पटकन ओळखून आक्रमण लावले. तब्बल २ तास २१ खेळाडूंसोबत लढत दिली. यामधील १२ खेळाडूंसोबत विजय, ५ खेळाडूंसोबत बरोबरी आणि ४ पराभव स्वीकारले.

सायमलटेनियस चेसच्या आयोजनामध्ये विशेष प्रोत्साहन प्राईड ग्रुपच्या शिल्पा बगाडिया यांचे लाभले. वल्लभच्या यशाबद्दल जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे आणि सचिव हेमेन्द्र पटेल यांनी विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *