
छत्रपती संभाजीनगर ः गरवारे कम्युनिटी सेंटर व जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत सर्वेश वारे, सारंग कुलकर्णी आणि श्रीराम वैभव यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर उत्कर्ष पांचाळ, भालचंद्र दुधगावकर आणि विराज मुंडे यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
गरवारे कम्युनिटी सेंटर येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत एकूण ११० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. विजेत्यांना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल व गरवारे कम्युनिटी सेंटरचे सुनील सुतवणे, रमाकांत रौतले निलेश जोशी, अमरीश जोशी.
बुद्धिबळ प्रशिक्षक विलास राजपूत, मिथुन वाघमारे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिथुन वाघमारे यांनी केले.
अंतिम निकाल
९ वर्षांखालील गट ः १. सर्वेश वारे, २. उत्कर्ष पांचाळ, ३. हितांश सुराणा, ४. सिद्धांत कोठेचा, ५. तेजस गाडेकर.
१५ वर्षांखालील गट ः १. वैभव श्रीराम, २. विराज मुंडे, ३. रेवांत साहू, ४. ऋतुराज सावरे, ५. श्री जय नाईक.
खुला गट ः १. सारंग कुलकर्णी, २. भालचंद्र दुधगावकर, ३. आयुष कोटेचा, ४. देवांश तोतला, ५. स्वराज विश्वासे.
उत्तेजनार्थ ः अविनाश वारे, श्रीनिधी देशमुख, हितांश सुराणा, समित कुलकर्णी, धैर्य केदार, उन्मेषा मनोरकर, हितांश सुराणा, आर्या नाईक व वीरभद्र डोणगावकर.