
मुंबई ः मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १९ पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीने पुष्कर पाटील यांची २०२५-२६ हंगामासाठी स्ट्रेंथ अँड कडिंशनिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील क्रीडा जगतात आनंदाची भावना व्यक्त केली जात आहे.
पुष्कर पाटील हे प्रमोद वाघमोडे यांचे विद्यार्थी असून त्यांनी लेक सिटी स्पोर्ट्स क्लब येथे प्रारंभिक १० वर्षे अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्या शिस्तबद्ध, मेहनती आणि प्रेरणादायी प्रवासाला ही एक मोठी यशाची पायरी ठरली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने पुष्कर पाटील यांना एमसीए शरद पवार इनडोअर क्रिकेट अकादमी येथे रिपोर्ट करण्यास सांगितले. त्यांचा अधिकृत करार व संबंधित कागदपत्रे लवकरच प्रदान करण्यात येणार आहेत. पुष्कर पाटील यांच्या या निवडीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई अंडर-१९ संघ उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.