
लेजेंड्स वर्ल्ड चॅम्पियनशिप
लंडन ः लेजेंड्स वर्ल्ड चॅम्पियनशिपचा पहिला हंगाम इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करून जिंकला होता. आता या स्पर्धेचा दुसरा हंगाम १८ जुलैपासून खेळला जाणार आहे, जो इंग्लंडच्या भूमीवर होणार आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी होतील. यामध्ये पाकिस्तान चॅम्पियन्सची कमान मोहम्मद हाफीजच्या हाती आहे.
पाकिस्तान चॅम्पियन्समध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे काही चेंडूत सामन्याचा मार्ग बदलतात. शाहिद आफ्रिदी संघात आहे, जो स्फोटक फलंदाजीत तज्ज्ञ आहे. इमाद वसीमचाही संघात समावेश आहे, ज्याने ३९५ टी २० सामने खेळले आहेत आणि १२ अर्धशतकांसह ४१४८ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ३६६ विकेट्सही घेतल्या आहेत. पाकिस्तान चॅम्पियन्सच्या संघात शोएब मलिकसारखे स्टार खेळाडू आहेत, ज्यांनी टी-२० क्रिकेटमध्ये १३००० हून अधिक धावा केल्या आहेत.
पाकिस्तान चॅम्पियन्सचा पहिला सामना इंग्लंड चॅम्पियन्सविरुद्ध
पाकिस्तान चॅम्पियन्सचा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मध्ये पहिला सामना १८ जुलै रोजी खेळला जाईल. त्यानंतर २० जुलै रोजी त्यांचा इंडिया चॅम्पियन्सविरुद्ध भव्य सामना होईल. २५ जुलै रोजी हा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि २६ जुलै रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल. त्यानंतर, त्यांचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना २९ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सविरुद्ध असेल.
एकूण ६ संघ सहभागी होतील
पाकिस्तान चॅम्पियन्स व्यतिरिक्त, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ देखील डब्ल्यूसीएल २०२५ मध्ये सहभागी होतील. निवृत्त झालेले खेळाडू या लीगमध्ये आपला लौकिक दाखवताना दिसतील.
पाकिस्तान चॅम्पियन्स वेळापत्रक
१८ जुलै (शुक्रवार): इंग्लंड चॅम्पियन्स विरुद्ध
२० जुलै (रविवार): भारत चॅम्पियन्स विरुद्ध
२५ जुलै (शुक्रवार): दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स विरुद्ध
२६ जुलै (शनिवार): वेस्ट इंडिज चॅम्पियन्स विरुद्ध
२९ जुलै (मंगळवार): ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स विरुद्ध
पाकिस्तान चॅम्पियन्स संघ
मोहम्मद हाफिज (कर्णधार), इमाद वसीम, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, सरफराज अहमद, शरजील खान, वहाब रियाझ, आसिफ अली, कामरान अकमल, आमिर यामीन, सोहेल खान आणि सोहेल तन्वीर.