
रत्नागिरी ः गुरुपौर्णिमा निमित्ताने प्रशिक्षक प्रशांत मनिषा मनोज मकवाना आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच, एशियन युनियन कोच, महिला प्रशिक्षक रंजना मोंडूला यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू, राज्य पदक प्राप्त खेळाडूंनी एकत्र ऐऊन गुरुपौर्णिमेच्या दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
गणराज क्लब मधून अनेक राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू त्यांनी घडवले आहेत. त्यातील काही खेळाडू आता शिक्षक, तर काही डॉक्टर, काही नेव्ही मध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर मयुरेश नडगिरी, क्रीडा शिक्षक अनिकेत पवार, नेव्हीमध्ये अदिती शिवगण, सिव्हिल इंजिनिअरिंग साहिल शिवगण, खेलो इंडिया सारख्या स्पर्धांमध्ये गौरी विलणकर, त्रिशा मयेकर सुवर्णं पदक, सीबीएसई सुवर्ण पदक सुरभी पाटील, गौरी विलणकर, राष्ट्रीय स्पर्धा सहभाग अथर्व मुरकुटे, राज्य स्पर्धा रौप्य पदक बरखा सेंद, कास्य पदक दुर्वा हातिसकर असे अनेक खेळाडू निर्माण केले आहेत.या सर्वांनी आपल्या प्रशिक्षक आपल्या गुरुला सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतले.
या प्रसंगी विधी विवेककुमार दुबे, अहद नवीद वस्ता, निरज प्रशांत मकवाना, आहाना आशिष रसाळ, आध्या आशिष रसाळ, जैनब वसिम काझी, तीर्था प्रशांत मकवाना, अनया अभिज्ञ वणजू, समर्थ सुशांत विचारे, अथर्व आत्माराम मुरकुटे, विहान प्रसाद शेट्ये, बरखा सर्फराज संदे, युमना सर्फराज संदे, अर्णव अभिज्ञ वणजू, अखिलेश वांयगणकर, मीरा वांयगणकर, स्पर्श रेडीज, माहीरा मयुर कदम, स्वराली जाधव, शौर्या जाधव, ध्रुव देशमुख, त्रिशा मयेकर, गौरी विलणकर, श्रेष्ठा विलणकर, स्वानंद तुपे या सर्व यशस्वी गणराज तायक्वांदो क्लब खेळाडूंनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या प्रशिक्षकांचे आशीर्वाद घेतले.
गणराज क्लबचे सर्व पदाधिकारी व सर्व पालक वर्ग,अध्यक्ष वकील, पूजा शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडूळा, सदस्य स्नेहा मोरे, परेश मोंडूळा, शलाका जावकर, टेक्निकल प्रमुख परेश मोडूळा, सीनियर खेळाडू डॉ मयुरेश नडगिरी, आदिती शिवगण, गौरी विलणकर, त्रिशा मयेकर, साहील शिवगण, स्वानंद तुपे, अखिलेश वांयगणकर, विहान शेट्ये, केशर शेरे आदींनी शुभेच्छा दिल्या.