क्रीडा सह्याद्री फाउंडेशनतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

  • By admin
  • July 11, 2025
  • 0
  • 81 Views
Spread the love

निफाड ः क्रीडा सह्याद्री फाऊंडेशनतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मानवी जीवनातील गुरुचे स्थान लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात मैदानाची पूजा करून करण्यात आली. प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरू हा त्याची आई असते. त्यानंतर विविध गुरू त्यांच्या आयुष्यात येतात. शिक्षकांच्या आणि पालकांनी केलेल्या संस्कारामुळे माणूस घडतो. विद्यार्थ्यांच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तितकाच मोठा वाटा शिक्षकांचा असतो.

या कार्यक्रमासाठी क्रीडा सह्याद्री क्लबचे राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते  राष्ट्रीय खेळाडू दक्ष गायकवाड याने आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये तो कसा घडला, खेळाडू कसा झाला याबद्दल त्याने विद्यार्थ्यांना व त्याच्या मित्रांना व आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान किती मोठे असते हे आपल्या मनोगततून सांगितले. 

क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा विषयी मार्गदर्शन केले व गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते याबद्दल माहिती देत खेळाडूंना गुरुपौर्णिमेचे महत्त्व पटवून दिले. क्रीडा सह्याद्री  फाउंडेशनचे सदस्य विनोद गायकवाड, चेतन कुंदे, दत्तू रायते, रमेश वडघुले, प्रतीक्षा कोटकर, विजय घोटेकर, कीर्ती कोटकर, श्याम चौधरी, लखन घटमाळे यांनी सर्वांनी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *