
पुणे ः पुणे जिल्हा हौशी मुष्टियुद्ध संघटनेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ मुष्टीयुद्ध मार्गदर्शक आणि राष्ट्रीय मुष्टीयुद्ध पंच अरविंद ठोंबरे यांचा खास सत्कार क्रीडा संघटक पुणे जिल्हा हौशी मुष्टियुद्ध संघटनेचे सरचिटणीस सुनील नेवरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
तारांगण सोसायटी, कोथरूड, पुणे येथे हा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी पराग गानू होते. अरविंद ठोंबरे यांनी महाराष्ट्रीय मंडळ, टिळक रोड, पुणे येथे गेली ५० वर्षे बॉक्सिंग प्रशिक्षण दिले आहे. यावेळी माजी राष्ट्रीय मुष्टियुद्ध खेळाडू श्रीनाथ हगवणे, वंदना अरविंद ठोंबरे, विवेक बापट आदी मान्यवर क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.