
सोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचा उपक्रम
सोलापूर ः सोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष गवळी अण्णप्पा काडादी प्रशालेचे पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील, क्रीडा विभाग प्रमुख नागप्पा मैंदर्गी, शरदचंद्र पवार प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख राजाराम शितोळे, छत्रपती शिवाजी प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख मारुती घोडके, प्रशांत राणे यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच सेवापूर्ती निमित्त डी के आसावा प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक भरती पुणे विभागाचे कार्याध्यक्ष जितेंद्र पवार व मानवता प्रशाला मद्रेचे मुख्याध्यापक सदाशिव व्हनमाने यांचा सेवापूर्ती निमित्त आणि दैनिक तरुण भारतचे क्रीडा पत्रकार सोलापूर जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव अजित संगवे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे प्राचार्य अरुण मित्रगोत्री, क्रीडा शिक्षक महासंघाचे शहराध्यक्ष प्रा संतोष खेंडे, सचिव सुहास छंचुरे, खजिनदार गंगाराम घोडके व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी क्रीडा शिक्षक महासंघाचे सहसचिव श्रीधर गायकवाड, प्रबुद्ध चिंचोलीकर, प्रशांत कदम, संतोष पाटील, शिवाजी वसपटे, श्याम गुदपे हे उपस्थित होते.